____विश्व आदिवासी दिन___
विश्व आदिवासी दिन करतो साजरा
मूळ आदिवासींचा सण आहे खरा
नाचू गाऊ या रे आपल्या या सणाला
आपली आदिवासी संस्कृती आज दाखवू या जगाला
आदिवासी आहे मी जंगलाचा राजा
जल जंगल जमिनीवर हाक्क आहे माझा
आदिवासी असल्याचा आहे अभिमान
जगावेगळी आहे आमची संस्कृती महान
रानामध्ये खेळतो जय आदिवासी बोलतो
मनापासून मानतो देव निसर्गाला
आपली आदिवासी संस्कृती आज दाखवू या जगाला
झोपडीत राहातो आम्ही राजावानी
ऐकून घ्या आमची खरी हि कहाणी
सुख समाधानाने राहातो रानात
निसर्गाशी आहे आमचं अतूट हे नातं
झाडांसंग बोलतो वाऱ्यासंग डोलतो
घाबरत नाही आम्ही कधी कुणाला
आपली आदिवासी संस्कृती आज दाखवू या जगाला
आदिवासी आहे मी मालक जगाचा
डरकाळी फोडतो मी रुबाब वाघाचा
बंडकरी आहे मी वीर राघोजीचा
उलगुलान करतो आम्ही बिरसा मुंडाचा
आदिवासी पोरं आम्ही नाही कमजोर
याची जाणीव आहे आम्हाला
आपली आदिवासी संस्कृती आज दाखवू या जगाला
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment