___बाबांची लेखणी___
सलाम बाबाच्या लेखणीला
त्यांच्या महान कार्याला
ज्यांच्यामुळे आम्हाला
राघोजी भांगरे कळाला
पहाडी नागीण लिहिली
त्यात रुखमीनी साकारली
आदिवासी नारीशक्तीची
ताकद त्यात दाखवली
बाडगीची माची,रतनगड
क्रान्तिविर बाळु पिचड
सल्लागार देवजी आव्हाड
यांनाही आणले उजेडात
रामजी भांगरे,गोविंद खाडे
हेही आम्हाला माहीत नव्हते
राया ठाकर,बुधा पेढेकर
यांनाही त्यांनी केले सादर
बाडगीच्या माचीने किमया केली
माहिती यांची समोर आली
क्रान्तिवीरांना उजेडात आणणारी
बाबांची लेखणी मात्र थांबली
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment