नऊ ऑगस्ट

_____नऊ ऑगस्ट____

नऊ ऑगस्टची तयारी केली जोरात
याच दिवसाची पाहात होतो वाट

आदिवासींच्या या सणाला
आनंद झालाय मनाला
वंदुन क्रान्तिवीरांना
त्यांच्या धाडसी गुणांना
त्यांनी दाखवली आम्हाला नवी पहाट
याच दिवसाची पहात होतो वाट

महान आमची संस्कृती
गुणगान तिचे गाऊ किती
महान आहेत चालीरीती
महिमा त्यांचा वर्णू किती
आमच्या भीनल्यात भीनल्यात मनामनात
याच दिवसाची पहात होतो वाट

सण हा प्रत्येक शहरात
सर्वच खेडे गावात
प्रत्येक घराघरात
आम्ही साजरा करतोय जोरात
सण साजरा करतोय आनंदात
याच दिवसाची पहात होतो वाट

या महान भारत देशात
आम्ही रहातोय डोंगर दऱ्यात
या सह्याद्रीच्या खोऱ्यात
आम्ही रहातोय मोठ्या तोऱ्यात
आमच्या सणाचा बघून घ्या हा थाट
याच दिवसाची पाहत होतो वाट

          सिताराम कांबळे

Comments