_____बिचारा खेकडा___
पाणी साठलं धरण फुटलं
मंत्र्यांना मात्र अजब वाटलं
मात्रयांनीं लावला अजब शोध
यातून कोणी घेईल का बोध
भोंगळ कारभार कोण काय करणार
मंत्रयांनीं धरले खेकड्याला जबाबदार
आता काय होणार खेकडेच मरणार
ठेकेदार मात्र निर्दोष सुटणार
मंत्रयांचा जोर खेकडा कमजोर
मंत्री म्हणतो खेकडा लाचखोर
आता काय करणार खेकड्याला धरणार
फासावर काय आता खेकड्याला चढवणार
खेकडा बिचारा घाबरून गेला
खडकाच्या कपारीत लपून बसला
मी नाही बोलतो फोडलं धारण
नका माथी मारू माझ्या माझंच मरण
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment