____रानवाट____
आम्ही रहातो रानात
निसर्गाच्या सानिध्यात
रानपाखरं रोज येतात
आमच्या गवताच्या घरात
पाखरांचा किलकीलाट
मंजुळ वाऱ्याची ती लाट
प्राणी पक्षांचा दिसतो
रोज वेगळाच थाट
झऱ्यांचा खळखळाट
त्यांचा मंजुळ आवाज
वृक्ष वेलींना चढला
आता वेगळाच साज
रानं झाली हिरवीगार
गायी जातात रानात
वासरांच्या ओढीनं
लवकर येतात गोठ्यात
सीताराम कांबळे
Comments
Post a Comment