_____झोप____
झोपेचं सोंग घेऊन
राहू नको झोपून
तुला झोपवायला
वैरी बसलेत टपून
तुला कायमचा झोपवून
वैरी जातील निघून
तुझी उडेल झोप तेव्हा
वेळ जाईल निघून
अजूनही वेळ आहे
डोळे उघडुन बघ
आजूबाजूला आहेत
समस्यांचे काळे ढग
भरपूर आहेत समस्यां
पण तुला नाही माहीत
कारण तू डोळे उघडून
आजूबाजूला पहात नाहीस
बाजूला ठेव काळझोप
आता तरी डोळे उघड
नाहीतर जगणं तुझं
होईल खूपच आवघड
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment