धुंदी

_____धुंदी_____

धुंदी असो कशाचीही
पैशाची या प्रसिद्धीची
एक मात्र नक्की आहे
गळा घोटते माणुसकीची

ज्याच्या डोक्यात घुसते
त्याला ती बरबाद करते
समाज आणि माणसातून
खूप दूरवर घेऊन जाते

माणसाच्या मेंदूवर पण
तिचाच फक्त ताबा असतो
खोट्या प्रसिद्धीच्या प्रेमापोटी
सर्वांनाच तो गमावून बसतो

स्वार्थासाठी माणुसकीची
ठेऊ लागतो तो गहाण
म्हणतो साऱ्या जगात
मीच फक्त आहे महान

म्हणतो मला नाही आता
गरज कुणाची राहिली
माझ्या हिंमतीवरच मी ही
वैभवाची दुनिया पाहिली

कुठे जन्मला कसा जन्मला
याचाही त्याला विसर पडतो
पैशाच्या मागे धावता धावता
माणुसकीचा झरा मात्र आटतो

         सिताराम कांबळे

Comments