_____सह्याद्री____
सह्याद्रीच्या डोंगरावर
आम्ही वाढलो खेळलो
त्याचं रक्षण करायला
दुष्मनांशीही लढलो
आता झालाय बदल
नाही कुणाला कदर
परकियांची आतीक्रमण
होऊ लागली त्याच्यावर
आमच्या देवळांना नजर
आज दुसऱ्याची लागली
काही देवळही आमची
त्यांनी ताब्यात घेतली
आम्ही जातो कधीतरी
आमच्या देव दर्शनाला
तिथली अवस्था पाहून
वाईट वाटतं मनाला
आमच्या गडकिल्ल्यांवर
मोठी हॉटेलं होतील
शूरवीरांच्या रक्तात
दारू ओतून पेतील
अशी आमची दुरावस्था
उघड्या डोळ्यांनी पहातो
कोणी नाही करत विचार
वाद आपसात घालतो
सिताराम कांबळे
Nice sar
ReplyDelete