_____क्रांतीची मशाल____
क्रांतीची मशाल पेटवली मनामनात
आमच्या क्रांतिवीरांनी केली अन्यायावर मात
आता येउद्या जन्माला राघोजी बिरसा घराघरात
जेव्हा झाले अत्याचार
पेटून उठले क्रांतिवीर
गोर गरीब जनतेसाठी
झाले जीवावर उद्धार
आपल्यासाठी क्रांतीज्योत घेतली हातात
आता येउद्या जन्माला राघोजी बिरसा घराघरात
तिरकामठा कुऱ्हाड भाला
हाती घेऊन ते लढले
मनघटाच्या जोरावर
इंग्रज सावकार फोडले
समाजासाठी क्रांतिवीर लढले दिन रात
आता येउद्या जन्माला राघोजी बिरसा घराघरात
समोर शत्रू आसताना
नाही मानली कधीच हार
प्राणाची लावली बाजी
नाही घेतली माघार
स्वातंत्र्याची इच्छा त्यांच्या होती मनामनात
आता येउद्या जन्माला राघोजी बिरसा घराघरात
बरेच क्रांतिवीर आमचे
इतिहासात गडप झाले
मोठा घडवला उतिहास
जगासमोर नाही आले
त्यांच्या पराक्रमाची गाथा नाही लिहिली इतिहासात
आता येउद्या जन्माला राघोजी बिरसा घराघरात
सिताराम कांबळे
Suprr
ReplyDelete