भयाण रात्र

____भयाण रात्र____

विकासाच नावाखाली
उध्वस्त केलं आमचं गाव
रात्रीच्या काळ्या अंधारात
साधला बघा कसा डाव

झाडावरचे पक्षांना सुद्धा
घर आपलं सोडावं लागलं
चिल्यापील्यांचा चिवचिवाट
बंद होताना पहावं लागलं

अंधाराची ती भयाण रात्र
खरोखरच भयाण होती
एका झाडाची कत्तल करून
हजारो संसार गाडत होती

जंगली जीवांच्या निवाऱ्याची चिता
त्यांच्यासमोर जळत होती
त्या पेटत्या चितांची धग
हृदय त्यांचं जाळत होती

प्राणी गेले पक्षीही गेले
राहिला फक्त आदिवासी राजा
त्यालाही आता बाहेर काढून
तडीपारीची मिळेल सजा

जंगलाचा रक्षण करताच
आता दोषी ठरवला जाईल
आदिवासी संपेल तेव्हाच
देशाचा विकास होईल
अशीही घोषणा केली जाईल

आदिवासींच्या अस्थित्वाची
झाडांबरोबर कत्तल होईल
विकासाच्या नावाखाली
राजालाही बेघर केलं जाईल

        सिताराम कांबळे

Comments