____विकासगंगा____
विकासाची गंगा आता
उलटी वाहू लागली
गावातील बायका पोरं
देसात जाऊ लागली
जनावरासारखा लिलाव
माणसांचा होऊ लागला
दुसऱ्याच्या शेतात राबून
जीव त्यांचा जाऊ लागला
पोटाचा खळगा भरण्यासाठी
स्वाभिमानाला मारावं लागलं
हातावर पोट भरता भरता
पोटासाठी फिरावं लागलं
तीन चारशे रुपयासाठी तो
स्वता बाजारात विकला गेला
जल जंगल जमिनीचा राजा
कधीच दुसऱ्याचा गुलाम झाला
इथला मूळ मालक आज
पोटासाठी धडपड करतोय
टीचभर पोट भरण्यासाठी
गावीगावी फेऱ्या मारतोय
मूळ मालक असून सुद्धा
आज तो उपरा झालाय
एक वेळच्या भाकरीसाठी
आज तो गुलाम झालाय
होईल का परिवर्तन आता
की हीच परंपरा चालणार
येणारी नवी पीढी तरी
नाही का बदल घडवणार
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment