___गावच्या समस्या__
शिकून सवरून मोठे झाले
गावाला सोडून शहरात गेले
मागे वळून बघत नाय
तुमचा असून उपयोग काय
नाही समाज कार्यात आले
परगावचे रहिवासी झाले
तुम्हाला गावच आठवत नाय
तुमचा असून उपयोग काय
गावात पाण्याची सुविधा नाही
येण्या जण्याला रस्ते नाही
पण यांसाठी करायचं काय
तुमचा असून उपयोग काय
आरोग्य सुविधा नाही गावात
आपल्या या दुर्गम भागात
पण यासाठी करायचं काय
तुमचा असून उपयोग काय
सोय नाही शिक्षनाची
मोठी समस्या विध्यार्थ्याची
पण यासाठी करायचं काय
तुमचा असून उपयोग काय
तरुण फिरतात बेकार
त्यांना नाही रोजगार
पण यासाठी करायचं काय
तुमचा असून उपयोग काय
सिताराम कांबळे
गारवाडी ता.आकोले जि. अ. नगर
Comments
Post a Comment