दसरा

___दसरा____

आज आहे दसरा
मतभेद विसरा
वाईट विचारांना
देऊ नका थारा

नका जाळू आज
रावणाचा पुतळा
त्यापेक्षा मनातील
दुर्गुण फक्त जाळा

मनातील अहंकाराच
करा आज दहन
सोडून देऊ आता
मतभेदांचं राजकारण

इतकं केलं तरी
खूप काही होईल
दसऱ्याचा आनंद
नक्की लुटता येईल

सिताराम कांबळे

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक
           सुभेच्छा

Comments