______निसर्ग देव____
सुंदर असा हा निसर्ग राजा देव त्याला मी मानतो
डांगाणी मावळी बोलीभाषा आदिवासी बोलतो
चाळीसगाव डांगणात,निसर्गाच्या सानिध्यात
आम्ही रहातो आनंदाने,पशुपक्षांच्या कळपात
रान पाखरांचा आवाज मंजुळ कानात घुमतो
डांगणी मावळी बोलीभाषा आदिवासी बोलतो
आमच्या घराचं आंगण,त्यांचं खेळाचं मैदान
पशुपक्षी खेळतात,इथं मोठ्या आनंदानं
त्यांचा पाहून क्रीडा रास सह्याद्री डोलतो
डांगणी मावळी बोलीभाषा आदिवासी बोलतो
चहू बाजूंनी डोंगर,मध्ये वसलाय आमचा गाव
इथली मायाळू माणसं,एकमेकांना लावतात जीव
एकजुटीने राहून आम्ही,एकमेकांना आधार देतो
डांगणी मावळी बोलीभाषा आदिवासी बोलतो
रोज पावसाच्या दिवसात,झऱ्यांचा खळखळाट
रोज सकाळी सकाळी,पाखरांचा कीकीलाट
मंत्रमुग्ध होऊन आम्ही आनंदाने ऐकतो
डांगणी मावळी बोलीभाषा आदिवासी बोलतो
सुंदर असा हा निसर्ग राजा देव त्याला मी मानतो
डांगणी मावळी बोलीभाषा आदिवासी बोलतो
सिताराम कांबळे
गारवाडी ता.आकोले,जि.अ.नगर
Comments
Post a Comment