___समाजासाठी____
शब्दांची तलवार करू
विचारांची धार लाऊ
अन्यायाशी लढण्यासाठी
आपण सर्व सज्ज होऊ
आपसातील मतभेदांना
देऊ कायची मूठमाती
एक होऊन लढलो तरच
तरच होईल आपली प्रगती
अहंकाराला ठेऊ बाजूला
जागृत करू समाजाला
तरच कोणी दाबणार नाही
आपल्या लढाऊ आवाजाला
आपसातील मतभेद सोडा
अहंकाराला मातीत गाडा
आपल्या या समाजासाठी
आपुलकीचं नातं जोडा
एकमताचा वाढऊ आवाज
जागृत करू सारा समाज
आपल्या हक्कांसाठी आपण
जागृत राहिलं पाहिजे आज
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि. अ. नगर
Comments
Post a Comment