_____रात्रीचा खेळ____
रात्रीच्या काळ्या अंधारात
मांडला होता एक खेळ
नाही समजलं कुणालाच
घड्याळाने कधी बदलली वेळ
कुणालाही कल्पना नव्हती
बघा कसा झाला हा घात
सर्व झोपले होते गोधडीत
अलार्म वाजला घड्याळात
डोळे उघडून बघितले तर
नवरदेव होता जोमात
नवरीचा हात घेऊन हातात
मुहूर्त पहात होता घड्याळात
नावं ठेऊ नका घड्याळाला
सारा खेळ नियतीनेच केला
नाही कळू दिले कुणाला
धनुष्यालाही आडवा केला
जनतेकडे भीक मागून
सत्तेसाठी झाले लाचार
जनतेच्या भावना तुडवून
त्यांनी स्थापन केले सरकार
पहा वेळ कशी ही आली
मताची किंमत झीरो झाली
सत्तेसाठी सर्व सोडून
शेजाऱ्याची लंगोटी धरली
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment