_____मैत्रीण____
बालपणीची माझी एक
आगळी वेगळी मैत्रीण होती
खूप भेटल्या मैत्रिणी पण
तीच माझी आवडती होती
मला सोडून कधीच ती
दूर कधी जात नव्हती
नाही दिसली थोडावेळ तर
चैन मला पडत नव्हती
मित्र माझे म्हणत होते
इला आता सोडून दे
ईच्या प्रेमाच्या जाळ्यातून
लवकर आता बाहेर ये
त्यांचं म्हणणं मला तेव्हा
आजिबात पटत नव्हतं
खूप समजून सांगत होते
पण मला ते समजत नव्हतं
आता मात्र खरच मला
तिची साथ सोडायची आहे
दुसरी तिसरी कोणी नसून
ती गायछाप तंबाकू आहे
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment