सह्याद्री अभियान

___सह्याद्री अभियान___

कोणी निंदा कोणी वंदा
समाजसेवा आमचा धंदा
निस्वार्थी आहोत आम्ही
नाही करत खोटा धंदा

टीका करणारे करणारच
जळणारे तर जळणारच
वीचलीत न होता कधी
कार्य आमचे करणारच

ऊन असो पाऊस असो
संकटे येत राहतील अनेक
त्यांना नाही घाबरत आम्ही
जोपर्यंत आम्ही आहोत एक

एकीचा नारा,एकीचा वारा
भिनलाय आमच्या अंगात
नाही मागे सरणार आम्ही
सह्याद्रीच्या या रणांगणात

आमचे हे निस्वार्थी कार्य
अखंड असे चालूच राहील
सह्याद्रीच्या प्रत्येक शिखरावर
फडकी झेंडा फडकत राहील

        सिताराम कांबळे

Comments