*_____नारीशक्ती_____*
माणुसकीचे झरे आटले
अन्यायाचे ढग दाटले
संयमाचे बांध फुटले
क्रांतीचे ते वारे पेटले
अन्याय आत्याचार वाढले
क्रांतिवीरांनी मौन सोडले
दऱ्या खोऱ्यातून लढले
अन्यायाचे पाश तोडले
तिरकामठा तो घेऊन हाती
तळपल्या तलवारीच्या पाती
कुऱ्हाड भाला घेऊन हाती
लढले आपल्या समाजासाठी
आताही गुन्हेगारी वाढली
नारीशक्ती धोक्यात आली
बाहेर फिरणं मुश्किल झालं
नाही कुणाच्या ध्यानात आलं
जागृत होऊद्या नारीशक्ती
येउद्या जन्माला दुर्गावती
झलकारीची कल्पनाशक्ती
रुख्मिणी खाडेची पतीभक्ती
पुन्हा नवा इतिहास घडवा
एकीची ताकद पुन्हा वाढवा
नारीशक्ती ही कमजोर नाही
ताकद तिची आजच दाखवा
*सिताराम कांबळे*
*गारवाडी ता.आकोले,जि. अहमदनगर*
Comments
Post a Comment