संकल्प अभियान

*_संकल्प अभियान_*

आमचं सह्याद्री अभियान
त्याचा आम्हाला अभिमान
सर्वच समाजासाठी आहे
आमची महाराष्ट्राची शान

याच्या मार्फत राबवतो
आम्ही वेगवेगळे उपक्रम
त्यात गरजू लोकांसाठी
देतो नेहमीच अग्रक्रम

झाडे लावा झाडे जगवा
हा दिला पहिलाच नारा
पाणी भरलं गावात तेव्हा
पुरग्रस्थाना दिला निवारा

सह्याद्री अभियाना अंतर्गत
शक्य तितकी मदत केली
मेडिकल कॅम्प लावून
रुग्णांनचीही सेवा केली

अभियानाचे अनमोल कार्य
यापुढे अखंड चालूच राहील
सह्याद्री संकल्प अभियान 
सर्वांच्याच स्मरनात राहील

        *सिताराम कांबळे*
              *सभासद*
 *सह्याद्री संकल्प अभियान*

Comments