________लढाई_______
लढाई झाली होती मोठी रतन गडावर
गोविंद खाडे बारी गावाचा होता किल्लेदार
इंग्रजांनी चढाई केली होती किल्ल्यावर
गोविंदरावांचा मुलगा कृष्णा होता बालवीर
इंग्रजांचं सैन्य चढून आलं किल्ल्यावर
दुश्मनांच्या समशेरीला भिडल्या समशेर
दोघांच्याही सैन्यात युद्ध झालं घनघोर
लढता लढता कृष्णा खाडे झाला होता ठार
खबर कानोकान मिळाली पत्नी रुख्मिणीला
नाही रडत बसली बंदूक लावली खांद्याला
बसून घोड्यावरती टाच मारली घोड्याला
वाऱ्यासारखी जाऊन पोचली पाभार खिंडीला
गोऱ्या सायबाला माहीत नव्हतं काळ जवळ आला
अचूक नेम धरून हल्ला रुख्मिणीने केला
बंदुकीची गोळी जाऊन भिडली डोक्याला
गोरासाहेब उलथून खाली धर्तीवर पडला
रुख्मिणीने घेतला आपल्या कुंकाचा बदला
पाभारखिंडीत रुख्मिणीचा इतिहास हा घडला
रुख्मिणीवर प्रतिहल्ला इंग्रजांनी केला
पाभार खिंडीत रुख्मिणीचा देह कामी आला
प्रणाम करतो रन रागिनी रुख्मिणी खाडेला
नारीशक्तीचा आदर्श दाखवून दिला जनतेला
सिताराम कांबळे
गारवाडी ता.आकोले,जि. अ. नगर
Comments
Post a Comment