______डांगणी_____
मी रहेतोय डोंगर दऱ्यात
या सह्याद्रीच्या खोऱ्यात
मला म्हणत्यात डांगानी
फिरतो वाघाच्या रानात
कधी व्हतो मी गाईखा
गुरा चारितो रानात
गुरा जोगुण झालेव
नेतो जाळीच्या पानेवं
सरवानाच्या महिन्यात
सारखी पावसाची बुरबुर
तव्हा घोंगडीचा घोंगता
सारखा घेतो डोक्यावर
कधी व्हतो शेतकरी
नांगर,कुळव हातात
द्वान बइलांची जोडी
आउत धरीतो शातात
कधी शिकारी व्हवून
नदीकाठी मी फिरतो
खेकडी, मासं धरून
मोठ्या चविना मी खातो
रानातला रानमेवा पहून
पाणी सुटाताय त्वांडाला
आळवा, करवंदा खाऊन
ग्वाड वाटाता जीवाला
कधी मोहाळा काढितो
लई मॉद तेंची गॉड
जव्हा डसत्यात माशा
सुजून जाता आखा त्वांड
असा हाये मी डांगणी
आखा डांगणच माझा
राज्य करीतो राणावं
हाये दुनियाचा राजा
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि. अ. नगर
Comments
Post a Comment