______क्रांती____
क्रांती अशी करा की
साऱ्या जगात नाव होईल
खेड्या पाड्यातील आदिवासी
जगाच्या इतिहासात येईल
क्रांती अशी करा की
जगाचे डोळे दिपले पाहिजेत
कसा आहे आदिवासी
साऱ्या जगाला कळला पाहिजे
क्रांती अशी करा की
चंद्र सुद्धा तापला पाहिजे
क्रांतीच्या या तेजापुढे
सूर्य सुद्धा दिपला पाहिजे
क्रांती अशी करा की
आदिवासी पेटला पाहिजे
प्रत्येक आदिवासीत
राघोजी,बिरसाच दिसला पाहिजे
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment