स्वार्थी माणूस

______स्वार्थी माणूस_____

आदिवासी म्हणायची लाज वाटते
इथंच गड्या तुझी ती लायकी कळते

आदिवासी समाजाचा सुविधा घेऊन
झालास तू मोठा आज शिकून सवरून
आदिवासी संस्कृतीही डोळ्यात सलते
इथंच गाड्या तुझी ती लायकी कळते

नाही आला कधी तू समाज कार्यात
नाही कोणी ओळखत स्वताच्या गावात
फायद्यासाठी फक्त तुला जमात दिसते
इथंच गडया तुझी ती लायकी कळते

शिकला म्हणून आज तू गेला शहरात
नाही फिरून बघितलं आपल्या गावात
गावाकडची वाट तुझ्या पायांना टोचते
इथेच गड्या तुझी ती लायकी कळते

अजूनही वेळ आहे डोळे उघड तू
आपल्या जन्मभूमीला विसरू नको तू
जन्मभूमी तुझी आज वाट पहाते
इथेच गड्या तुझी ती लायकी कळते


             सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि. अ. नगर

Comments