क्रांती ज्योत

____क्रांती ज्योत___

फुल्यांची ती क्रांतीज्योत
दिवसरात्र तेवत होती
स्त्रीयांच्या शिक्षणासाठी
ज्ञानप्रकाश देत होती

दगड गोट्यांचा वर्षाव
अंगावरती झेलत होती
मनुवादी प्रवृत्तीला ती
भीक कधी घालत नव्हती

पडत होते अंगावर तिच्या
चिखल आणि शेणाचे गोळे
तरी नाही मागे हटली कधी
शेणालाही मानली फुले

स्त्री शिक्षणाचा अधिकार
त्यांना तेव्हा मिळत नव्हता
स्त्री सुशिक्षित करण्याचा
निश्चय तिचा पक्का होता

सर्व संकटांचा सामना करत
कार्य तीचं ती करत होती
मुलींना प्रकाश देण्यासाठी
स्वता मात्र जळत होती

         
💐💐विनम्र अभिवादन💐💐

       सिताराम कांबळे

Comments