____वणवा____
आग लागली रानाला
चटके बसले मनाला
कितीतरी मुके प्राणी
आज मुकले प्राणाला
पंख असुनही पक्षी
नाही उडाले हावेत
काळ्या मृत्यूने त्यांना
बघा घेतले कवेत
हिरव्या झाडा झुडुपात
रहात होते आनंदात
आज पेटला वानवा
निसर्गाची सुटली साथ
झाडा झुडुपांचीही बघा
आज झाली राखरांगोळी
नाही ऐकू शकला कोणी
त्यांची भयभीत किंकाळी
वनव्याच्या त्या ज्वालांनी
वेढा दिला त्या रानाला
नाही बाहेर जाऊ दिले
तेथील मुक्या जीवांना
धूर आगीच्या लोंढ्यात
जीव सृष्टी नष्ट झाली
नाही कळले कुणाला
अशी वेळ का ही आली
निसर्गाशी नको खेळ
साधा त्याचा समतोल
नाहीतर आपल्यावरही
येईल हीच काळी वेळ
झाडे लावा झाडे जगवा
आपला निसर्ग वाचवा
तरच साऱ्या जीवसृष्टीला
मिळेल जन्म नवा
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि. अ. नगर
Comments
Post a Comment