_____इतिहास_____
क्रांतीवीरांचा आदर्श घेऊन
नवी पिढी हि घडवायची
लाज नाही रे बाळगायची
जय आदिवासी बोलायची
समाज येतोय आपला पुढं
नाही येणार कोणीच आड
एकदा बाहेर येऊन लढ
नाही होणार कोणी वरचड
आहे संस्कृती आपली शान
बाळगा तीचाच आभिमान
क्रांतीवीरांचं गाऊ गुणगान
देऊ त्यांनाच पहिला मान
आहे इतिहास आपला मोठा
आपल्या समोर नाही आला
इतिहासाचा अनमोल ठेवा
स्फुर्ती देईल आपल्याला
नका विसरू भूतकाळाला
योग्य दिशेने चाललाय वारा
जानू इतिहास आपला खरा
चला शोधू इतिहासाला
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment