__जंगलाची राणी__
मी जंगलाची राणी
माझी साधीच रहाणी
रोज सकाळी सकाळी
वहाते डोक्यावर पाणी
गाया म्हशींचा गोठा
रोज काढिते झाडून
हाऱ्याखालच्या कोंबड्या
देते चराया सोडून
घेते भाकरी कराया
होता नेहरीची वेळ
रोज नेहरी करून
जाते रानात निघून
काट्याकुट्याचं ते रान
मी तुडवीते अनवाणी
टोचता पायाला ते काटे
येते डोळ्यातून पाणी
काड्याकुडयांचं सरपान
त्याची मोळी डोक्यावरी
दिवस जातो बुडायला
तेव्हा निघते मी घरी
चिली पिली माझी घरी
वाट माझी बघतात
मी जवळ जाताच
गळ्यामधी पडतात
तशी आहे मी खंबीर
नाही मानत मी हार
आनंदाने संभाळीते
माझा सोन्याचा संसार
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले
Comments
Post a Comment