___आदिवासी वाघ___
आजवर नव्हती जाणीव कसली,बसला होता तो झाडीत
आला रे आला आदिवासी वाघ डरकाळी फोडीत
आज्ञानाच्या अंधारात
रहात होता तो रानात
लागला शिक्षणाचा वास
आला धावून तो गावात
आंन्याय आत्याचार त्याने काढले मोडीत
आला रे आला आदिवासी वाघ डरकाळी फोडीत
आहे बाहुत त्याच्या जोर
कधी नव्हता तो कमजोर
पिऊन वाघिणीचं दुध
लागला करायला गुरगुर
अंधश्रद्धेचा डोलारा त्याने काढला मोडीत
आला रे आला आदिवासी वाघ डरकाळी फोडीत
लागली शिक्षणाची गोडी
आली अक्कल थोडथोडी
समाजाच्या विकासासाठी
घेतली समाजकार्यात उडी
बोगस घुसखोरांचे डाव काढले मोडीत
आला रे आला आदिवासी वाघ डरकाळी फोडीत
चांगला शिकून सवरून
आता आलंय शहाणपण
करून मजबुत संघटन
लढू लागला मनापासून
बोगस लांडगे घाबरून आता लपतील झाडीत
आला रे आला आदिवासी वाघ डरकाळी फोडीत
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि.अ.नगर
Comments
Post a Comment