______कोरोना_____
कोरोना आला,डोईजड झाला
त्याला लागले सर्व घाबरायला
माहीत नाही किती दिवस
लागतील त्याला घालवायला
परदेशातून पाव्हना आला
इथलाच तो घरजावई झाला
कोणालाच काही समजत नाही
कसा घराबाहेर काढावं त्याला
सर्वच त्याला घाबरू लागले
चर्चा त्याचीच करू लागले
आपल्या जवळच्या माणसाकडे
संशयाने आता पाहु लागले
मानसं तोडली,माणसं गाडली
सर्वांची याने झोप उडवली
आशा या संकट काळी
जवळची माणसं दूर गेली
बघावं तिकडे त्याचीच बातमी
आफवांचाही भरलाय बाजार
सर्वच काळजी करू लागलेत
कसा जाईल हा दुष्ट आजार
काळजी घ्या,स्वच्छता राखा
गरज असेल तरच बाहेर पडा
महत्वाचं म्हणजे गर्दी टाळा
तरच कोरोनाला बसेल आला
सिताराम कांबळे
गारवाडी,अकोले,अहमदनगर
Comments
Post a Comment