जागतिक संकट

____जागतिक संकट____

चीनचा व्हायरस कोरोना आला
साऱ्या जगात हाहाकार झाला
घराचाही त्याने कोंडवाडा केला
कोणीच नाही विसरणार त्याला

सर्वांनीच आता घरात बसावे
निकडीच्या वेळीच बाहेर जावे
तोंडावरी मास रुमाल बांधावे
रस्त्यावरी व्यर्थ ना फिरावे

सुरक्षित अंतर ठेवून चालावे
गर्दीची ठिकाणे टाळत जावे
सर्वांनी नियमांचे पालन करावे
प्रशासनाला सहकार्य करावे

आपणच आता आपल्याला जपावे
मतभेद सोडून सर्वांनी एकत्र यावे
शक्य असेल त्याला सहकार्य करावे
कोरोनारूपी शत्रूला परत पाठवावे

भीती कोरोनाची व्यर्थ ना बाळगावी
कुटुंबाची आपणच काळजी घ्यावी
शक्य तितकी जण जागृती करावी
जिंकण्याची जिद्द उरी बाळगावी

आला तसा कोरोना जाईल निघून
खूप काही गोष्टी जाईल शिकवून
प्रशासकीय नियमांचे पालन करून
कोरोनारुपी संकट लाऊ परतून

          सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले, अहमदनगर

Comments