कोरोना व्हायरस

_____कोरोना व्हायरस"____

ठेऊन गाफील सर्वांना,आला माणसं मारायला
द्या पाठवून चायनाला,या कोरोना व्हायरसाला

नाही बघीतले याने वृद्ध,मोठे नी लहान
याने भारतात येऊन केले सर्वांना हैराण
सर्व सरकारी यंत्रणा याने लावली कामाला
द्या पाठवून चायनाला,या कोरोना व्हायरसला

झाले कामधंदे बंद,सर्व बसलेत घरात
कोणी मरतोय उपाशी,कोणी आलेत रस्त्यात
नाही मिळत साधन,त्यांच्या गावाला जायाला
द्या पाठवून चायनाला या कोरोना व्हायरसला

रात्रंदिवस पोलीस खात,आहे उभं या रस्त्यात
एक वेळचं जेवणही,नसेल उतरत घशात
करु सहकार्य त्यांना,हा कोरोना घालवायला
द्या पाठवून चायनाला,या कोरोना व्हायरसला

किती मानावे आभार,या आरोग्य खात्याचे
जीव धोक्यात घालून,काळजी घेतात रुग्णांचे
देव बसलाय यांच्यात,नका जाऊ शोधायला
द्या हाकलून चायनाला,या कोरोना व्हायरसला

           सिताराम कांबळे
गारवाडी ता.अकोले,अहमदनगर

Comments