_____तुझाच बाजीराव_____
भांडु नको जोरात अशी तू,ऐकेल सारा गाव
आगं कशाला खातेस भाव,मी तुझाच बाजीराव
फिरू नको उन्हात अशी तू पडशील काळी काळी
निघ बाहेर फिरायला फक्त सकाळी संध्याकाळी
मनात तुझ्या माझ्यासाठी ज्योत प्रेमाची लाव
आगं कशाला खातेस भाव,मी तुझाच बाजीराव
रोखठोक हे माझं बोलणं,धरू नको ग राग
वेड्यासारखा तुझ्यासाठी मी फिरतोय मागं मागं
मनात माझ्या तुझंच राणी कोरून ठेवलंय नाव
आगं कशाला खातेस भाव,मी तुझाच बाजीराव
जोडी आपली राजाराणीची दिसेल ग शोभून
भावना नाजूक मनातल्या तू ठेऊ नको दाबून
धूम धडाक्यात करू या लग्न बघत राहील गाव
आगं कशाला खातेस भाव,मी तुझाच बाजीराव
तळमळ माझ्या प्रेमाची गं कशी समजना तुला
प्रेमाच्या या झाडावरती बांधू प्रेमाचा झुला
एक मताने करू या मंजूर प्रेमाचा ठराव
आगं कशाला खातेस बाव,मी तुझाच बाजीराव
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment