_____मीच माझा रक्षक_____
आलं कितीही संकट मोठं फिरू नका मागं
कोरोनाच्या विषाणूला या लाऊ या आगं
गर्दी करोनी आमंत्रण देऊ नका त्याला
विनाकारण फिरू नका रे जाऊन रसत्याला
बाहेर जाऊन आणू नका रे घरी कोरोनाला
त्याच्यापासून दूर ठेवा आपल्या कुटुंबाला
आपल्यासाठी पोलीस आहेत कामात व्यस्त
बाहेर जाऊन त्यांना तुम्ही करू नका त्रस्त
आरोग्य खातं आपल्यासाठी करतंय जीवाचं रान
कोरोना जवळ करून त्यांना करू नका हैराण
आपणच करु आपले आता आपणच रक्षन
नाहीतर करोना करील आता आपलेच भक्षण
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment