लग्नाळू

________लग्नाळू_____

कोरोना जाईना,लगीन होईना
सांगा आता मी काय करू
हाताने स्वयंपाक करू,की असाच उपाशी मरू

ठेवलं होतं जमवून लग्न
सर्व होते कामात मग्न
कुठून लपत छपत
आलं कोरोनचं हे विघ्न
गाड्या बंद, विमानं बंद, कसा तिला मी आनु
हाताने स्वयंपाक करू,की असाच उपाशी मरू

जवळ आली होती तारीख
होते सर्वच आनंदात
या कोरोनाने  केला घात
आणला अडथळा लग्नात
लग्नावाचून झुरत राहिलंय गरबाचं लेकरु
हाताने स्वयंपाक करू,की असाच उपाशी मरू

वाटलं होतं लॉकडावून
आता जाईल संपुन
मग थोड्याच दिवसात
घेईल लग्न मी उरकून
लॉकडावून थांबला नाही राहिला पुढेच चालू
हाताने स्वयंपाक करू की असाच उपाशी मरू

लॉकडाऊच्या दिवसात
नाही पैसाही हातात
नाही हाताला कामधंदा
खाऊन बसतोय घरात
ठरवून टाकलंय दोघांनीही ऑनलाइन लग्न करू
हाताने स्वयंपाक करू की असाच उपाशी मरू

         सिताराम कांबळे

Comments