निसर्ग देव

_____निसर्ग देव____

विकासाच्या नावाखाली
निसर्गाचा ऱ्हास झाला
समजून घे माणसा तुझा
आंत आता जवळ आला

एका मागून एक संकटं
सावज तुला करू लागली
एकाच वेळी चहू बाजूंनी
काळ बनून घेरु लागली

महापूर आले,भूकंप झाले
तरीही तुला नाही समजले
म्हणून तुला सावध  करन्या
साथीचे रोगही पुढे आले

आता तरी डोळे उघड
निसर्गाची हानी टाळ
नाहीतर समजून घे आता
जवळ आलाय तुझा काळ

कितीही केली प्रगती तरी
निसर्गाला आडऊ नको
तुझ्याच हाताने मरण तुझे
जवळ ओढवून घेऊ नको

निसर्ग हा देवच आहे
त्याचीच तू पूजा कर
त्याच्या सानिध्यात राहून
सुखी जीवनाचा मार्ग धर

        सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,अ. नगर

Comments