__________काराण________
मी बारीक व्हतो तव्हा आमच्या गावात एक भगत व्हता भीमा गोड्या त्याचा नाव.तव्हा कोणी आजारी पडला का त्या दुखानसरुला पहिला तेच्याक नेयेची.त्याला कारणा बरीच असतील.एकतं आमचा गाव लईच आतमधी हाये पार डोंगरात.जवळ दवाखाना नव्हता.अजूनही नही.चांगली सडाकइ नही.आता तरी कशाय फटफटया हायात तव्हा काहीच साधान नव्हता.आशा बऱ्याच अडचणी व्हत्या म्हणून दुखानसरूला दवाखान्यात नेता येत नव्हता.
आन तव्हा लॉकांचा भक्तांव लईच इस्वास असायचा.आन भगतई सांगायचा डाक्टरकं नेऊ नका नाहीतं चड व्हईल.लॉकांचा भगतावर इस्वास आसल्याना त्याना आंगार दिला का आपला दुखना पळून जाईल अशी तेंची समजूत असायची.आता कोणाच्या पोटात दुखत आसल,कोनाला ताप येत आसल तर नाहीतं आजून काही बारीक सारीक दुखना असतील तर ती काय जास्त दिवस रहात नाहीत.थोड्या दिसात बरी व्हत्यात.
याचा फायदा भगताला चांगला व्हयाचा.तो काय करायचा बारीक आजार आसल याक कोंबंडीचा आंडा, एक नारेळ त्या दुखानसरूच्या अंगावरून उतरून जिथं तीन वाट एकजागी येत्यात तिथं टाकायला सांगायचा, आम्हाली माहीत झाला का आज उतारा टाकणार हायेत आम्ही ध्यान ठिउनच रहेचो.तो उतारा टाकणारा घरी पोचायच्या आधीच तो उतारा डाव्या पायाना उडून तो नारेळ आणि कोंबडीचा आंडा लांब घेऊन जायेचो.नारेळ फोडून खायचो आन आंडा दुसऱ्या दिशी गुरांकं गेलो का त्याला शान लावून बुजून खायेचो.लय मजा येयेची तव्हा.
एखादा दुखानसरु जरा जास्तच आजारी आसल तर तेच्यावरून कारण ठरल्यालाच असायचा.उरफाटा कोंबडया आन काळी तलग,मग त्या कारण देयाला आधार पडता पडता पार खाली दऱ्यात जायला लागायचा तासाकं, कदाचित जास्त जास्त माणसा येयाला नको हाही हेतू आसल,पण आमची चारपाच जणांची टोळीच व्हती कोणालाय समाजला का आज कारण आहे आम्ही सगळीच जायचो तिकडं पीतळ्या पार बंडीत घालून नेयेचो क्वाना बघू नही म्हणून.
कोंबडा कापायला काय तव्हा मुलानेची गरज नव्हती.कोणीही कापायचा.कारणाची जागा ठरलेली असायची पाण्याजवळ.फक्त सरपान कुठून तरी आणाया लागायचा.आचारीही आमच्यातलंच पका तिखाट कांजी करायचं जास्त खाऊ नही म्हणून.पण वाढाया मातर ठराईक जनच राहेचं.आंम्ही काय पोरासोरा म्हणून आम्हाली दोनदोन खडं भेटलं तरी त्यातच खुष व्हयेचो उखर सगळी तेनलीच.आम्हाली अर्धी पीतळीभर कांजी जरी भेटला तरी लय खुष, त्यातच नागलेच्या भाकरी चुरून खायचो.तव्हाचं दिवसच लय येगळ व्हतं.
एखादा दुखानसरू मोठ्या आजारातून बरा झाला त मग मेंढरुच.वरसातून दोन तीन तरी मेंढरा निघायची.तव्हा मातर भरपूर बरबाट भ्याटायचा पण आशा संध्या जास्त नव्हत्या भेटत.
कारणाचा एक बरा व्हता खाणारांची मजा व्हयेची आन भगताचीही.भगत एका दुखानसरूकून सवा किलु त्याल आन सवा मिटर कापाड घेयाचा गेलं ते भगत आन दिवसई गेलं राहिल्यात फक्त त्या जुन्या आठवणी
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,अ.नगर
Comments
Post a Comment