रानपाखरं

___रानपाखरं____

पाणी मीळना रानात
काय करतील पाखरं
थेंबभर पाण्यासाठी
फिरतात सारं शिवारं

घरटं उंच झाडावर
त्याला फांदीचा आधार
गेली पानं हि गळुनं
केला उन्हाने कहर

कडक उन्हापासून
कसं करावं संरक्षण
याच काळजीत दोघे
फिरतात वणवण

रानावनात फिरून
मिळना चारापाणी
त्यांनी घेतली भरारी
बळ पंखात भरोनी

आले गावाच्या कुशीला
दान्यापाण्याच्या शोधात
तिथं झाली त्यांची सोय
म्हणून थांबले गावात

तीथलं दुषीत वातावरण
त्यांना होईना सहन
पुन्हा गेले ते रानात
निरोप गावाचा घेऊन

     सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,अ.नगर

Comments