गावची वाट

____गावची वाट___

नव्हता कधी माणसात
नव्हता कधी समाजात
आज आठवला गाव
धरली गावाची ती वाट

फक्त ऑफिस आणि घर
एवढंच होतं त्याच जग
करोनाने उडवली झोप
तेव्हा आली त्याला जाग

कोरोनाला घाबरून
गेला गावाला निघून
बसले हातावर शिक्के
तरी बसना घरात

फीरतो गावाच्या गल्लीत
जाऊन बसतो देवळात
पोरं सोरं करून गोळा
खेळत बसतो मैदानात

गैरसमज आहे त्याचा
खेडे गावाच्या हद्दीत
नाही येणार करोना
आहे ठाम त्याच मत

रोज फिरतो गावभर
हास्य करतो वरवर
पण मनात माजलाय
त्या करोनाचा कहर

आशा विचित्र लोकांनो
तुमचं स्वागत गावात
बसा आता तरी शांत
आहे आमची एकच खंत
तुमच्यामुळे आखा गाव
नका आनु अडचणीत

        सिताराम कांबळे
गारवाडी ता.अकोले, अहमदनगर

Comments