____आमचे हाल_____
आलो आम्ही खुप लांबुन
देशाच्या काना कोपऱ्यातुन
नकोसा झालाय जीव आता
जावं वाटतं गावाला परतुन
दिवसभर मोलमजुरी करून
आनंदात काम करत होतो
आता येतील चांगले दिवस
याच आशेवर जगत होतो
पण आशेची निराशा झाली
उपाशी मरायची वेळ आली
काम धंदे येथील बंद झाले
चालू कामं जागेवरच थांबली
परदेशातून एक रोग आला
रोजगार आमचा बंद केला
रिकामे झाले खीसे आमचे
पैसे मिळेनात विष प्यायला
बंद झाले सर्व व्यावहार
तरीही नव्हती मानली हार
आता फक्त एकच विचार
कोण देईल आम्हाला आधार
हाता वरचं पोट आमचं
आता हातच बंद झाले
कसं जगावं आम्ही आता
बघा दिवस कसे हे आले
उपाशी राहू शकत नाही
गावी जाऊ शकत नाही
हालत अशी झाली की
काहीच करू शकत नाही
एकच मागणं आहे सरकारला
लवकर घालवा या महामारीला
आलो तसाच सुखरूप आता
नेऊन सोड आमच्या गावाला
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि.अ.नगर
Comments
Post a Comment