आज आलिया गावात ही पोरगी पुण्याची
कशी टकमका बघतिया ही पोरगी मामाची
हिचे गोरे गोरे गाल
बघा झाले कसे लाल
हिची हारणीची चाल
करते पोरांना घायाळ
हिला लागली आवड आता आपल्या गावाची
कशी टकमका बघतीया ही पोरगी मामाची
हीच वय आहे आठरा
करते भलताच नखरा
हिचे नखरे पाहून
पोरं मारतात चकरा
हिने उडवली झोप त्या आल्लड पोरांची
कशी टकमका बघतीया ही पोरगी मामाची
फिरते बुलेट घेऊन
काळ गॉगल लावून
सारी कॉलेजची पोरं
बोलतात जवळ जाऊन
सांग होशील का राणी या गरीब राजाची
कशी टकमका बगतीया ही पोरगी मामाची
उद्या भेटतो जाऊन
हाती गुलाब घेऊन
तिला करतो प्रपोज
जरा जवळ घेऊन
भीती वाटते मनात तिच्या खडूस भावाची
कशी टकमका बघतीया ही पोरगी मामाची
हिची कॉलेजची वाट
एकदा आडवली थेट
म्हणते बोलू नको आता
आज झालेय मी लेट
तिने भेटायची वेळ मला दिलेय उद्याची
कशी टकमका बघतीया ही पोरगी मामाची
Comments
Post a Comment