_____संकट_____
संकट नाही बघत कधीच
धर्म आणि जात पात
जो येईल त्याच्या समोर
त्याचा तो करतोच घात
गरीब असो की श्रीमंत
नाही करत तो भेदभाव
जेव्हा तो जातो जवळ
होते सर्वांची धावाधाव
वेळ,काळ नसते त्याला
कधीही येतो आणि जातो
पण जाता जाता माणसाला
खूप काही शिकवून जातो
भूतकाळात जगणारा माणूस
भविष्याची चिंता करतोय
वर्तमानात जगताना मात्र
वर्तमान काळच विसरतोय
उद्या खायला पाहिजे म्हणून
आजच तो उपाशी रहातोय
उद्या जिवंत राहील कि नाही
हे मात्र विसरून तो जातोय
उद्याची चिंता करण्यापेक्षा
आजचा दिवस जगून घ्या
समोर येईल त्या संकटाला
धीराने सर्व सामोरे जा
सिताराम कांबळे
Comments
Post a Comment