🙏🏼अभिवादन🙏🏼
हाच तो काळा दिवस
याच दिवशी घात झाला
क्रांतीवीर राघोजी आमचा
समाजासाठी कामी आला
जेव्हा वाढले अत्याचार
त्याने सोडले घरदार
इंग्रज आणि सावकाराचा
झाला राघोजी कर्दनकाळ
लुटला सावकारांचा खजिना
चोपड्या जाळल्या कर्जाच्या
तोडला सावकारीचा पाश
केला उद्धार गरिबांचा
इंग्रज सरकारचा शिरकाव
जेव्हा झाला डांगाणात
घेतले बंडकरी संगतीला
केला विरोध जोरात
जुल्मी इंग्रज सरकार
तेव्हा उठले चवताळुन
राघूला मारण्यासाठी
आले मोठी फौज घेऊन
राघू नव्हता सापडत
म्हणून रचला मोठा कट
मोठी आमिषे दाखवून
ओढले फितूर जाळ्यात
चंद्रभागेच्या पात्रात
पंढरपुराच्या हद्दीत
दिले राघूला पकडुन
केला फितुरांनीं घात
नेला ठाण्याच्या तुरुंगात
खटला एकतर्फी चालला
दोन मेच्या काळ्या दिवशी
वीर फासावर चढला
जरी संपले शरीर
राघू झाला तो अमर
त्याचे प्रेरणादायी विचार
नाही कधी संपणार
क्रांतिवीर राघोजी भांगरे यांना
💐विनम्र अभिवादन💐
Comments
Post a Comment