______स्वप्न______
गरीब घरात जन्म झाला
हाच का आमचा गुन्हा
चाललो आता गावाला
नाही येणार फिरून पुन्हा
आम्हालाही जगायचं होत
जगासोबत चालायचं होतं
ध्येय आमचं गाठायचं होतं
पण नियतीला हे मान्य नव्हतं
आशेची झाली निराशा
संपल्या आता सर्व आशा
जाऊ आम्ही सुखरूप गावी
हीच होती वेडी आशा
कुटुंबाची काळजी होती
काळीज आमचं जाळत होती
त्यासाठीच धडपडत होतो
मिळेल ते काम करत होतो
आमचीही काही स्वप्न होती
मेहनत करायची तयारी होती
पण सारं काही उलटच झालं
आल्या मार्गाने फिरावं लागलं
स्वप्न ती स्वप्नच राहिली
सकाळ त्यांची कधी ना झाली
धडधडत मालगाडी आली
स्वप्न आमची चिरडून गेली
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले, जि.अ.नगर
Comments
Post a Comment