गावची वाट

______गावची वाट______

वाऱ्याने पाला पाचोळा उडावा
तशी माणसं रस्त्याने उडत आहेत
पडत आहेत,झडत आहेत
परत उठून चालत आहेत

पोटाला लागलेली आग
पाणी पिऊन विझवत आहेत
संसाराचं ओझं डोक्यावर घेऊन
अनवाणी पायाने मैलो मैल चालत आहेत

वरतून उन्हाची आग
खाली तापलेली जमीन
सभोवताली गरम हवा
जनु चहू बाजूंनी लागलेला वणवा

उष्णतेच्या आगीने आंग भाजतंय
घरच्या ओढीनं काळीज जळतंय
माहीत नाही गाव आजून किती लांब आहे
पण एक एक पावलाने अंतर कापतोय

अंतर कमी झालं तरी
अडचणीही वाढत आहेत
चालून चालून पाय थकलेत
विश्रांतीची गरज आहे
पण विश्रांती कुठे घेणार
झोपेतही माणसं मरत आहेत
झोपेतही माणसं मरत आहेत.....

         सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले, अ.नगर

Comments