____लढावं लागेल____
जग सारं हादरलं
कोरोना व्हायरसनं
सर्वच बसले घरात
आवघड झालं जगणं
याच्या भीतीनं दूरवर
किती पळत राहणार
बिळामध्ये किती दिवस
उंदरासारखे बसणार
कधीतरी एक दिवस
बाहेर निघायचंच आहे
येणाऱ्या त्या संकटांना
तोंड द्यायचच आहे
जगण्यासाठी घरात बसलो
पण आता बदलावं लागेल
जगण्यासाठीच आता पुन्हा
घराबाहेर पडावं लागेल
बचाव आपला करता करता
खेळ आता संपत आला
बचाव पुरा नाहीच झाला
शत्रू मात्र जवळ आला
बचाव करणं सोडा आता
लढायचं कसं शिकून घ्या
संकटकाळी समोर येऊन
संकटाला धैर्याने तोंड द्या
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि.अ.नगर
Comments
Post a Comment