______रानपाखरं______
डोंगर दऱ्या, कडे कपारी
आमच्यासाठी वैभव भारी
रानामधली रानपाखरं
येऊन खेळती आमचे दारी
रोज सकाळी,संध्याकाळी
रानपाखरे,चिवचिव करती
भरलेल्या कणसांवरती
रोज येउनी ताव मारीती
आडवत नाही,आम्ही त्यांना
त्यांचा हिस्सा ते खातात
किडी खाऊनी पिकांवरच्या
आम्हालाच ते मदत जरतात
संकटसमयी,सारे मीळुनी
एकच करतात चीचीवाट
शत्रू लांब पळून जातो
पाहून त्यांची एकजूट
हिरव्यागार झुडुपात बसुनी
रोजच करतात किलकीलाट
चारा पाणी घेऊन जातात
चिल्या पिल्यांसाठी घरट्यात
आमच्यापासून दूर कधीही
जात नाहीत ही रानपाखरं
त्यांचं,आमचं,नात प्रेमाचं
टिकून राहील विश्वासावर
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि.अ.नगर
Comments
Post a Comment