____रानभाजी____
लय गॉड गॉड लागती
रानभाज्यांची भाजी
फांजी चिरून मुटकी
मही करायची आजी
चाई,भोकरीचा बार
आता मीळना खायाला
त्याची चाखाया चव
जाया लागल गावाला
लय चवाची आलवड
तीचं करून पातवड
तेंच्या तळून चकल्या
लय लागत्यात गॉड
फुला पिवळी बाहेची
लय भाजी तेंची भारी
तेंच्या संगती खायाला
असू कंचीही भाकरी
भोकरा,मोहट्या फोडून
कांदा कापून टाकून
लय चवदार भाजी
पॉट जाताय भरून
सिताराम कांबळे
गारवाडी,ता.अकोले
Comments
Post a Comment