अंधार

_______अंधार______

जरी दिसला मला अंधार समोर
पाहून त्याला मी नाही थांबणार

पाहून संकटांना नाही मागे हटणार
प्रयत्नांचे गीत मी रोज गात राजनार

अंधारात प्रयत्नांची मी ज्योत लावणार
त्या उजेडात ध्येय माझं मीच गाठणार

रात्रीनंतर दिवस निसर्गाचा नियम आहे
आज नंतर उद्याचा सूर्य दिसणार आहे

अंधाराला मागे टाकून पुढे मी जाणार आहे
नव्या अनुभवाची पहाट मी पाहणार आहे

नाही थांबणार आता आले अडथळे कितीही
ध्येय माझे गाठणार मी प्रतिकूल परिस्थितही

रात्रीचा काळा अंधार उद्या संपणार आहे
 नव्या युगाची पहाट उद्या दिसणार आहे

              सिताराम कांबळे
गारवाडी,ता.आकोले,जि.अहमदनगर

Comments