_____माणुसकी____
माणसात आंतर ठेवा
पण मनात नका ठेऊ
माणुसकीला सोडून
जास्त दूर नका जाऊ
दिवस येतील,जातील
सारं काही सुरळीत होईल
मनाने दुरावतील त्यांना
जवळ येणे अवघड होईल
एकमेकांना समजून घ्या
एकमेकांना आधार द्या
ही एक परीक्षा आहे
उत्तर नीट समजून घ्या
अडचणी येतच राहणार
दिवस जातच राहणार
निसर्गाचा नियम आहे हा
कुणालाही नाही चुकणार
आज आहे उद्या नाही
प्रेमात आहे सर्व काही
प्रेमाने जगा प्रेमाने वागा
माणसात आपला देव बघा
सिताराम कांबळे
८६५२७५९९२८
Comments
Post a Comment